फुलचंद कराड यांच्या हस्ते आज घटस्थापना,
उद्यापासुन देवी कथा
परळी,श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक दुर्गा उत्सव साजरा करण्यात येत असून रविवार दि. 29 सप्टेंबर श्री देवीची मुर्तीची घटस्थापना मुख्य मार्गदर्शक तथा अध्यक्ष फुलचंद कराड व सौ. सुमनताई कराड यांच्या हस्ते होणार आहे. रविवार पासुन नवरात्र उत्सवास प्रारंभ होत असून परळी येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने दर्गा उत्सव साजरा करण्यात येत आहे. आज घटस्थापना असुन सांयकाळी 5 वाजता फुलचंद कराड यांच्या हस्ते मोंढा मैदान येथे घटस्थापना होईल.
दरम्यान, 30 सप्टेंबर पासुन दररोज सांयकाळी 7 ते 9 यावेळेत दुर्गा देवी महात्म्य ः एक चिंतन, संगीतमय व सजीव देखाव्यासह सत्संग कार्यक्रम होणार आहे. परळीत प्रथमच हा कार्यक्रम होत आहे. ओंकारेश्वर येथील परमपुज्य डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे कथेचे निरूपण करणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी व सदस्यांनी केले आहे.
।