●_सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर_●
*ग्राहक व ठेवीदारांच्या विश्वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी*
परळी वैजनाथ /प्रतिनिधी-दि.
शहरातील अग्रगण्य पतसंस्था स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतंसस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख कायम ठेवत पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात 22 कोटी 16 लाख ठेवींचे उद्दीष्ट पुर्ण केले आहे. ग्राहक व ठेवीदारांच्या विश्वासावरच ही वाटचाल आहे.असा विश्वास पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केला आहे. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या वेळी ते बोलत होते.
संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या वेळी आहवाल व ताळेबंद सभेत सादर करण्यात आला. आर्थिक वर्षात संस्थेचा उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. विषेश म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी 22 कोटी 16 लाख रूपये तर सभासद भागभांडवल- 47 लाख 13 हजार, कर्ज- 17 कोटी 23 लाख,नफा- 25 लाख 90 हजार गुंतवणूक- 7 कोटी 33 लाख इतके आहे. येत्या अर्थिक वर्षांत 30 कोटी ठेवीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच संस्थेने अनेक समाजोपयोगी उपक्रमात नेहमी अग्रेसर राहत सहभाग घेतला आहे. दुष्काळाने होरपळून निघत असताना पाणपोया, कोल्हापूर -सांगली पुरग्रस्तांसाठी मदत, केरळ पुरग्रस्तांसाठी मदत आदींमध्ये अर्थिक सहयोग दिला.
पतसंस्थेच्या या प्रगतीशील वाटचालीत सर्व खातेदार,ठेवीदार,कर्जदार,हितचितक यांचा विश्वास हेच पाठबळ आहे. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अनिल आष्टेकर,सचिव जितेंद्र नव्हाडे ,कोषाध्यक्ष रवि वळसे, संचालक श्रीकांत मांडे,राजाभाऊ मराठे,रंगनाथ सावजी,रवि मुळे,दशरथ होळकर,डॉ.सौ.श्रध्दा देशपांडे, सौ.पद्मश्री धर्माधिकारी यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक किरण सावजी व सर्व कर्मचारी वृंद, नित्यसंचय ठेव प्रतिनीधी यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.