सौ.राजश्रीताई मुंडेंनी साधला कौडगाव साबळा,कानडी, मलनाथपूर, परचूंडी च्या मतदारांशी संवाद
परळीमतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न धनंजय मुंडे साकार करतील -राजश्री मुंडे परळी दि.29............... परळी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी धनंजय मुंडे यांना आपले आशीर्वाद द्या असे आवाहन सौ.राजश्रीताई मुंडे यांनी कौडगाव साबळा, कानडी, मलनाथपूर, परचूंडी येथील मतदारांशी संवाद साधताना केले धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ सुरू असलेल्या त्यांच्या मतदार संपर्क दौर्यात काल त्यांनी उपरोक्त गावांचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत जि.प.सदस्य अजय मुंडे, रा.काँ.युवक प्रदेशउपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, रा.काँ. तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती सुर्यभान मुंडे, पं.स.सदस्य वसंतराव तिडके, ज्ञानेश्वर साबळे, दत्ता कराड, राम शिंदे, उमेश साबळे आदी उपस्थित होते. महिलांच्या प्रश्नासाठी आग्रह -बदलत्या काळात कुटुंबाला महिलेचाही आधार असण्याची गरज आहे. महिलांचेही त्यांचे स्वतःचे अनेक प्रश्न, अडचणी आहेत, बचत गट असेल किंवा महिलांच्या रोजगाराचा विषय असेल, त्यांच्या प्रश्नासाठी मी धनंजय मुंडेंकडे तुमची मध्यस्थ म्हणून काम करेल. महिलांच्या प्रश्न सोडवण्याची जवाबदारी मी स्वीकारते तुम्ही आशीर्वाद द्या असे आवाहन राजश्रीताईंनी केले.