परळीत भागीदारी परिषदेला उत्तम प्रतिसाद ,
धनंजय मुंडे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है! च्या परिषदेत घोषणा !!
परळी दि.29... "मा. धनंजय मुंडे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है! अशा घोषणानी आजची भागीदारी परिषद गाजली . धनंजय मुंडे यांचे भाषण उपस्थितांना प्रभावित करणारी ठरले, सर्वसामान्य,उपेक्षित जनते विषयी त्यांना तळमळ असल्याची भावना परिषदे नंतर अनेकांनी व्यक्त केली,
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त परळीतील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने आयोजित भागिदारी परिषद विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी घेण्यात आली, परळीच्या हालगे गार्डन येथे आयोजित या परिषदेच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.मिलिंद आव्हाड उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे यांनी उपेक्षितांचे प्रश्न साहित्याच्या माध्यमातून मांडले. या वंचित समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांना आर्थिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या विकासाच्या प्रक्रीयेत आणण्याची गरज असून, ती जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घेत असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना केले.
, वंचित समाजाला न्याय देण्याचे काम मी करेल असा शब्द अण्णाभाऊ साठे आणि एकनाथ आव्हाड यांच्या वारसदाराच्या साक्षीने देतो असे धनंजय मुंडे म्हणाले.
*धनंजय मुंडे हे वंचित समाजाचे नेते- सचिन साठे, मिलिंद आव्हाड*
अण्णाभाऊ साठे आणि स्व.एकनाथ आव्हाड यांचे आम्ही वारसदार आहोत, मात्र त्यांच्या विचारांचा वारसा आमच्यासोबतच पुढे नेण्याचे काम धनंजय मुंडे हे करत असून, ते वंचित समाजाला नक्कीच न्याय देतील, त्यांच्या पाठीशी तुमची ताकद उभी करा असे आवाहन या परिषदेत सचिन साठे व मिलिंद आव्हाड यांनी केले.
या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, ज्येष्ठ बन्सीअण्णा सिरसाट, दत्ताआबा पाटील, रा. काँ. तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, मतदार संघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, रणजित चाचा लोमटे, प्रभाकरराव पौळ, विलास बापु मोरे, मारोतीराव माने, सुर्यभान मुंडे, डॉ.माणिकराव कांबळे, नांदेडचे वाघमारे, शेषेनारायण वाघमारे, राजेश घोडे, जयप्रकाश लड्डा, संजय देवकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री डी.जी.मस्के, रमेश मस्के, के.डी.उपाडे, नवनाथ जोगदंड, गोपाळराव कांबळे, मारोतीराव जोगदंड, वसंतराव उदार, भागवतराव वाघमारे, हनुमंत गायकवाड, नारायण पारवे, श्रीहरी कवडेकर, शिवा उदार, बालाजी मस्के, कमलाकर मिसाळ, जयराम उपाडे, शिवा पारधे, ज्ञानोबा मस्के, विलास आरगडे, भागवत वाघमारे आदींसह पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
-----------------------------------------