पर्जन्यवृष्टी साठी "हरहर महादेव" चा जयघोष करीत प्रभु वैद्यनाथास जलअभिषेक
प्रतिनिधी
29/09/2019 22:09:09
1353
, पर्जन्यवृष्टी साठी "हरहर महादेव" चा जयघोष करीत प्रभु वैद्यनाथास जलअभिषेक
परळी -"प्रभू वैद्यनाथ भगवान की जय" ,"हर हर महादेव "असा जयघोष करत सोमवारी सकाळी शिवभक्तांनी परळी तालुक्यासह मराठवाडयात पर्जन्य वृष्टी व्हावी साठी प्रभू वैद्यनाथास जलाभिषेक केला.लिंगायत समाजातील युवक ,पुरुषांनी दुष्काळ हटावा व पाऊस पडावा म्हणून प्रभू वैद्यनाथास साकडे घातले , मठपती संजय त्रिंबक स्वामी, धनंजय भीमाशंकर स्वामी यांनी अभिषेक केला ,
राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या मार्गदर्शनाद्वारे पिण्याचे पाणी, शेतीसाठीचे जलसिंचन व साठवण प्रकल्प भरण्याकरिता सोमवारी दि.30 सप्टेंबर रोजी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथास जलाभिषेक करण्यात आला
सकाळी 6 वा. श्री गुरूलिंग स्वामी मंदिर (बेलवाडी) परळी वैजनाथ येथे राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या सूचनेनुसार सर्व भक्तमंडळींनी स्वत: कलश आणून एकत्र आले , आणि वैद्यनाथा चा जय घोष करीत प्रभु वैद्यनाथास जलाभिषेक केला, परळी तालुक्यासह मराठवाडयातील काही जिल्हयात अपुऱ्या पावसामुळे भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.पाण्यावरची वैद्यनाथाची परळी अशी ओळख असणाऱ्या परळी शहर व तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करणारा नागापुर येथील वाण धरण ईतिहासात पहिल्यांदाच कोरडे पडले आहे.* परतीच्या पावसात तरी परळीसह मराठवाडयातील पिण्याचे पाणी,शेतीसाठीचे जलसिंचन व साठवण प्रकल्प पाऊस पडून भरण्यासाठी द्वादश ज्योतीर्लिंग प्रभू वैद्यनाथास स्वत: कलश भरून आणलेल्या पाण्याने जलाभिषेक व प्रार्थना केली,