*ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ साखर कारखान्याची सर्व साधारण सभा खेळीमेळीत*
परळी दि. ३० ------ वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना या भागातील ऊस उत्पादकांची कामधेनू आहे, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आत्मा इथे आहे, अनेक अडचणींवर मात करत आम्ही शेतक-यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला आहे, अडचणीच्या काळात साथ द्या, सहकार्य करा असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा कारखान्यात अध्यक्षा ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची १८ वी वार्षिक सर्व साधारण सभा कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कारखाना स्थळी मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, त्यावेळी उपस्थित सभासदांसमोर त्या बोलत होत्या. खासदार डाॅ प्रितमताई मुंडे,कारखान्याचे संचालक सर्वश्री फुलचंद कराड, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, पांडुरंग फड, ज्ञानोबा मुंडे, किशनराव शिनगारे, भाऊसाहेब घोडके, माधवराव मुंडे, शामराव आपेट, त्र्यंबकराव तांबडे, दत्तात्रय देशमुख, परमेश्वर फड, आश्रोबा काळे, गणपत बनसोडे, व्यंकटराव कराड, केशव माळी, जमुनाबाई लाहोटी आदी उपस्थित होते.
गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पश्चात निसर्गाने आतापर्यंत आपल्यावर अवकृपाच केली आहे, पाऊस नसल्याने सातत्याने येणारा दुष्काळ, पाण्याची अडचण त्यामुळे अतिशय कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे, परिणामी कारखाना चालवणे अतिशय अवघड झाले आहे. आर्थिक अडचणीतुन जात असतांना देखील स्वतः झळ सोसून शेतक-यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आहे. काही लोक कारखान्या विषयी चुकीचे आरोप करतात, शेतक-यांमध्ये संभ्रम निर्माण करतात पण कारखान्याचा एक रूपयाही बाहेर गेला नाही, गोपीनाथराव मुंडे यांचे संस्कार असल्याने कुणाचा रूपयाही मी बुडविणार नाही असे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. वैद्यनाथ कारखाना शेतक-यांची कामधेनू आहे, मुंडे साहेबांचा आत्मा इथे आहे, याठिकाणी मी समर्पणाने काम करते ,त्यामुळे कारखान्याच्या ताटात माती कालवण्याचा प्रयत्न कुणी करू नये सभासद शेतकरीही ते सहन करणार नाहीत असे त्या म्हणाल्या. यंदा पाणी नाही, त्यामुळे ऊस नाही परिणामी कारखाना बंद ठेवावा लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा स्थितीत तुमच्या सहकार्याची गरज आहे यातून नक्की मार्ग काढला जाईल असे सांगून अडचणीचा काळ आहे, साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीस सुरवात करण्यात आली. कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी प्रास्ताविक केले तर कार्यकारी संचालक दीक्षितूलू यांनी अहवाल वाचन केले. यावेळी वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष विनोद जैन, विकासराव डुबे, दत्ताप्पा ईटके, बाबुराव मेनकुदळे, सुखदेवराव मुंडे, डॉ. हरिश्चंद्र वंगे, गयाताई कराड, पांडुरंग सोनी, विजय वाकेकर, वैजनाथ जगतकर, जीवराज ढाकणे, सतीश मुंडे, गौतमबापू नागरगोजे, डॉ. ए. घ. मुंडे यांच्यासह कारखान्याचे सभासद, शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे संचलन ज्ञानोबा सुरवसे यांनी तर दिनकर मुंडे गुरूजी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
••••