*नुकसान भरपाई च्या मागणीसाठी किसान सभा करणार सोमवारी परळीत आंदोलन*
*परळी वै.ता.३० प्रतिनीधी*
दोन दिवसापुर्वी झालेल्या अतीवृष्टीमुळे पिकासह शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ आर्थीक मदत करावी यामागणीसाठी सोमवारी (ता.४) परळी उपविभागीय कार्यालया समोर आंदोलन करणार असल्याची माहीती कॉ. अजय बुरांडे यांनी दिली आहे.
गुलाब चक्रीवादळामुळे सतत तीन दिवस अतीवृष्टी झाली. अतीवृष्टीमुळे काढणीस आलेली बाजरी, सोयाबीन पाण्यात सडुण गेले आहे. कापसाचे पीकही हातचे गेले आहे. नदीकाठची जमीनीवरील माती वाहुण गेली आहे. शेतीला जोडणारे रस्ते वाहुन गेल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यु झाला आहे. काढलेल्या सोयाबीनचे ढिगारे वाहुन गेले आहेत. शेतकऱ्यांचे अतीवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासन व सरकारने तात्काळ सरसकट शेतकऱ्यांना मदत द्यावी या मागणीसाठी अखील भारतीय किसान सभा बीड जिल्हा कमेटी शेतकऱ्यांना सोबत घेउन परळी उपविभागीय कार्यालयावर सोमवारी (ता.३०) तीव्र निदर्शने करणार आहे. या आंगोलनात शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन माकप चे सचिव मंडळ सदस्य कॉ पी एस घाडगे, किसान सभेचे कॉ अजय बुरांडे, कॉ पांडुरंग राठोड, कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ सुदाम शिंदे, कॉ राधाकिसन जाधव यांनी केले आहे.
*नुकसानग्रस्त भागाची पहाणी*
परळी तालुक्यातील वाण धरण परिसरातील नागापुर, दौनापुर व वाणटाकळी परिसरातील शेती व पिकांचा पहाणी किसान सभेच्या कॉ पी एस घाडगे, कॉ अजय बुरांडे, कॉ पांडुरंग राठोड, कॉ मुरलीधर नागरगोजे यांनी गुरूवारी (ता.३०) सकाळी आठ वाजता पहाणी केली. यावेळी तेथील शेतकऱ्यांनी आपली व्यथा त्यांच्या समोर मांडुण न्याय मिळउन द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.