जि. प.सदस्य प्रदीप मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर
वाणटाकळी गावाला विशेष पॅकेज देण्याची केली मागणी
परळी/प्रतिनिधी
दोन दिवसापूर्वी पडलेल्या अतिवृष्टीमुळे वान टाकळी येथे निसर्गाचा प्रकोप पाहयला मिळाला असून शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे शेतकऱ्यांच्या चांगल्या जमिनी वाहून गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी चिखल तुडवत वान टाकळी येथील पूरस्थितीची पाहणी नागापूर सर्कलचे जि. प .सदस्य प्रदीप मुंडे यांनी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून शासनाने पंचनामे करून वाण टाकळी गावाला विशेष मदत (पॅकेज )द्यावे अशी मागणी केली.
वान टाकळी चे तलाठी श्री शेख साहेब यांना सोबत घेऊन अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली व पंचनामे करून शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेत शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे पशुपालन सुद्धा धोक्यात आली असून जवळपास शंभर जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत तसेच काही जणांचे पाण्याच्या प्रवाहामुळे अक्षरशः घरे वाहून गेली आहेत घरातील भांडी वाहून गेले आहेत व खाण्यासाठी त्यांच्याजवळ अन्न सुद्धा नाही रेशन नाही जवळपास 35 ते 40 लोकांनी आपला जीव मुठीत धरून झाडावर बसून अक्षरशः मुक्काम केला. घराची पडझड झाली असल्याचेही गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
वान नदीने पात्र बदलले असून दुसरे पात्र तयार केले आहे त्यामुळे ज्या जमिनीमध्ये दीडशे ते दोनशे टन ऊस होत होता त्या जमिनी अक्षरशः पाण्याने वाहून गेल्या आहेत आशा शेतकऱ्यांच्या पाठीशी शासनाने व प्रशासनाने खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे तसेच वान टाकळी मार्गे पठाण मांडवा - अंबाजोगाई कडे जाणारा रोड पाण्याच्या अति प्रवाहामुळे खचून गेला आहे त्यामुळे नागरिकांची रहदारी ठप्प झाली आहे तेव्हा हा मार्ग दुरुस्त करणे आवश्यक आहे त्या मार्गावरून अनेक दूध उत्पादक शेतकरी व नागरिक ये जा करत असतात.
अतिवृष्टीमुळे गावातील लाईटची डीपी व पोल अक्षरशः कोसळून पडले आहेत गावात कसल्याही प्रकारची लाईटची व्यवस्था नाही त्यामुळे महावितरणने त्वरित डी पी व लाईटची व्यवस्था करावी तसेच शेतातील काढणीला आलेले सोयाबीन ,बाजरी ,ऊस ही पिके नष्ट झाली आहेत त्यामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पावसाने हिरावून घेतला आहे अनेक जमिनीवर असलेला ऊस अक्षरशः वाहून गेला उत्तम सुरवसे या शेतकऱ्यांच्या एक बोर एक एकर जमीन तसेच हनुमंत गोविंद अजले यांची अर्धा एकर जमीन व विहीर वाहून गेली आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता शासनाने वानटाकळी गावाला विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी नागापूर जि प सर्कलचे सदस्य प्रदीप भैया मुंडे यांनी केली आहे.
पहाणी दौऱ्यात रामकृष्ण जाधव, माणिक कोकरे,विष्णू हंगे,नितीन जाधव पाटील, रामराजे जाधव, धनंजय कावळे, सरपंच हनुमंत माने, बंडा भाकरे, गोवर्धन अजले, रोहिदास गंगणे,प्रा.संदीपान मुंडे, बाबा घाडगे,इंद्रजित अजले, राजाभाऊ मुंडे, शंभुदेव अजले, तलाठी सहायक राठोड,मारोती मस्के,गोरख हंगे, महादेव मस्के, रोहिदास घाडगे,दासू घाडगे,पीराजी घाडगे ,गोपीनाथ हंगे , बालासाहेब घाडगे , आदींसह शेतकरी , युवक, नागरिक उपस्थित होते.