परळी वै. : आर्थिक वर्ष अखेर वैद्यनाथ अर्बन बँकेच्या ठेवी रू.९८९ कोटी ७९ लाखअसून कर्जे रू.५९७ कोटी आहे. गुंतवणूक रू .४२५ कोटी २९ लाख तर बँकेने रू.१५८७ कोटीच्या व्यवसायाची झेप पूर्ण केली आहे. कोवीड १९ च्या महामारीमुळे बऱ्याचशा कर्ज खात्यात वसुली न आल्याने बँकेला करपूर्व ढोबळ नफा ०३ कोटी ४५ लाख तर कर वजा जाता निव्वळ नफा रू. १ कोटी ८९ लाख झाला आहे अशी माहिती वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि. परळी वैजनाथ चे चेअरमन विनोद सामत सांगितले दि .३० सप्टेंबर २०२१ रोजी दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि. परळी वैजनाथ या बँकेची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र शासनाने कोवीड -१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सुचीत केल्यानुसार , कोवीड -१९ च्या सर्व नियमांचे पालन करुन बँकेचे चेअरमन विनोद सामत यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या ऑनलाईन संपन्न झाली. या सभेत ते बोलत होते. या ऑनलाईन सभेस सर्व उपस्थित सभासदांनी चांगला प्रतिसाद देऊन सभा यशस्वी केली. सभेच्या सुरवातीस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनोद खर्चे यांनी ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण ऑनलाईन सभेसाठी उपस्थित बँकेचे चेअरमन , सर्व संचालक मंडळ व बँकेचे सर्व सभासदांचे शब्द सुमनांनी स्वागत केले.
सभेची सुरवात प्रभु वैद्यनाथ तसेच बँकेचे श्रध्दास्थान लोकनेते गोपिनाथराव मुंडे यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. यानंतर सभेच्या नोटीसचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनोद खर्चे यांनी केले व अध्यक्षांना सभेची सुत्रे स्विकारण्याची विनंती केली. अध्यक्षांनी सभेची सुत्रे स्विकारल्यानंतर त्यांच्या भाषणात बोलतांना बँकचे श्रध्दास्थान स्व.गोपीनाथरावजी मुंडे , माजी चेअरमन स्व.मोमय्याजी व स्व.अशोकसेठ सामत यांचा बँकेच्या प्रगतीत सिहांचा वाटा असुन त्यांच्या आशिर्वादानेच बँकेची प्रगती होत असल्याचे मत व्यक्त केले.तसेच महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री , सौ.पंकजाताई पालवे - मुंडे आणि बीड जिल्ह्याच्या माननीय खासदार डॉ.प्रितमताई गोपिनाथराव मुंडे यांनी अहवाल वर्षात त्यांचा बहुमोल वेळ देऊन बँकेस वेळो - वेळी मार्गदर्शन केले याबद्दल हार्दिक आभार व्यक्त केले. तसेच बँकेचे माजी चेअरमन तथा जेष्ठ संचालक विकासराव डुबे, श्री अशोक जैन यांचेही वेळोवेळी सहकार्य लाभले असल्याचे सांगितले. अहवाल सालात संचालक मंडळाने यशस्वीपणे कामकाज पुर्ण करुन बँकेला प्रगतीपथावर नेले आहे. सभेच्या शेवटी संचालक प्रा.श्री दासु
वाघमारे यांनी आभार मानले . यावेळी सभेस बँकेच्या मुख्य कार्यालयात प्रत्यक्षरित्या तथा ऑनलाईन संचालक सर्व श्री अशोक जैन, विकासराव डुबे, नारायणराव सातपुते, डॉ.राजारामजी मुंडे, प्रकाशराव जोशी, पुरुषोत्तमजी भन्साळी, प्रविणजी देशपांडे, अॅड.जयसिंगराव चव्हाण, महेश्वरआप्पा निर्मळे,संदिपजी लाहोटी, उज्वलजी कोटेचा, खा.डॉ.श्रीमती प्रितमताई मुंडे, सौ.सुरेखाताई मेनकुदळे, रमेशराव कराड, प्रा.दासुजी वाघमारे, अनिलराव तांदळे तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद खर्चे उपस्थित होते .