एफ एम आकाशवाणी,रेडीओ मिर्ची व लोकल रेडीओ स्टेशन केंद्र सुरू करण्यासाठी लाक्षणिक उपोषण करणार ...चेतन सौंदळे
परळी, आकाशवाणी केंद्राचे एफ एम,रेडीओ मिर्ची तसेच लोकल रेडीओ स्टेशन सुरू करावे व याकडे दूर्लक्ष केल्यास म.गांधी जयंती निमित्त 2 अॉक्टोबर रोजी उच्च शक्ती दुरदर्शन केंद्र पिंपळा(धा.)येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांनी दिली. भारतातील बारा ज्योतीर्लिंगापैकी श्री.वैजनाथ पाचवे ज्योतीर्लिंग परळी वैजनाथ येथे तर महाराष्ट्रातील श्री.योगेश्वरी देवीचे प्रसिध्द मंदीर अंबेजोगाई येथे आहे.याठिकाणी देशभरातून भाविक-भक्त व प्रवाशी मोठया प्रमाणात येतात तसेच परळी-अंबेजोगाई धार्मिक,पुरातत्व,सांस्कृतिक,
सामाजिक,एैतिहासिक,औद्योगिक व राजकीय दृष्टया मराठवाडयातील महत्तवाची शहरे आहेत परंतू याठिकाणी ईतर एफ एम केंद्राचे प्रसारण स्पष्ट ऐकू येत नाही त्यामुळे आकाशवाणी केंद्राचे एफ एम,रेडीओ मिर्ची तसेच लोकल रेडीओ स्टेशन सुरू करण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ना.अनुराग ठाकुर यांना बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे,खासदार प्रीतमताई मुंडे यांनी शिफारस करण्याची मागणी नगरसेवक चेतन सौंदळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अंबेजोगाई तालुक्यातील पिंपळा(धा.) येथील1991 साली सुरू झालेल्या उच्च शक्ती दुरदर्शन प्रक्षेपण केंद्राच्याद्वारे प्रसारीत होणारे नॅशनल व डी.डी.न्युज चॅनेल भारत सरकारने बंद केली असून तांत्रिक दृष्टया वैधता संपत असल्यामुळे उच्च शक्ती दुरदर्शन प्रक्षेेपण केंद्रही 31अॉक्टोबर 2021पासून बंद करण्याचे आदेश प्रसारभारती दुरदर्शन महानिर्देशालय,दिल्ली यांनी दि.20-09-2021च्या पत्राद्वारे दिले आहेत.
त्यामुळे याठिकाणी पायाभूत सुविधा,जागा तसेच आवश्यक कर्मचारी संख्या उपलब्ध असल्यामुळे आकाशवाणी केंद्राचे एफ एम-रेडीओ मिर्ची व लोकल रेडीओ स्टेशन सुरू करून तांत्रिक दृष्टया लागणारे साहित्य उपलब्ध करून द्यावे तसेच अशाप्रकारचे केंद्र सुरू केल्यास स्थानिक कलाकारांच्या प्रतिभेला वाव मिळून हक्काचे व्यासपीठ मिळेल व मराठवाडयातील बीड,लातूर,उस्मानाबाद,परभणी,नांदेड जिल्हयातील लाखो लोकांना व प्रवाशी पर्यटकांना एफ एम केंद्राद्वारे सादर होणा-या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल.
त्यामुळे यास तातडीने मान्यता देवून आकाशवाणी केंद्राचे एफ एम,रेडीओ मिर्ची तसेच लोकल रेडीओ स्टेशन सुरू करावे याकडे दूर्लक्ष केल्यास म.गांधी जयंती निमित्त 2 अॉक्टोबर रोजी उच्च शक्ती दुरदर्शन केंद्र पिंपळा(धा.)येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांनी दिली आहे.