परळी , येथील न्यु हायस्कुल ,नवगण कॉलेज चे विद्यार्थी ,पुण्याचे उद्योजक अनिरुद्ध चव्हाण यांना पुण्यात मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दि. १७ सप्टेंबर २०२३ बालगंधर्व रंग मंच पूणे येथे मराठवाडा मुक्तिदिन अमृत महोत्सवा निमित्त पूण्यामधील मराठवाडा समन्वय समीतीने " मराठवाडा भूषण उद्योजक " या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे ,यावेळी तरुण उद्योजक अनिरुद्ध चव्हाण यांना आंतरराष्ट्रीय संशोधक सुरज ऐनगाडे ,पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, विवेकानंद भोसले यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला .यावेळी व्यासपीठावर मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, सचिव दत्ताजी त्र्यंबकराव मेहत्रे व इतरांच्या उपस्थिती होती. पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिरुद्ध चव्हाण यांचे परळी चे उद्योजक योगेश निर्मळे, माजलगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ निर्मळ पाटील, परळी तील राजेश चव्हाण, मयूर मुळजकर,प्रा पवन मुंडे,भोजराज पालिवा ल व इतरांनी स्वागत केले आहे