परळी -वीरशैव धर्माचे धर्म संस्थापक व आद्य जगद्गुरु श्री रेणुकाचार्य यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत समाज परळी च्या वतीने विविध कार्यक्रमास 20 मार्च पासून प्रारंभ करण्यात आला आहे.येथील लिंगायत समाजाच्या वतीने रेणुकाचार्य यांच्या जयंतीनिमित्त सिद्धांत शिखामनी ग्रंथाचे तीन दिवशी पारायण सोहळ्यास 20 मार्च पासून उत्साहात सुरुवात झाली आहे. यावेळी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभत आहे... श्री वैद्यनाथ मंदिर जवळील श्री रेणुकाचार्य यांच्या मंदिरात सकाळी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. वक्रेश्वर मंदिरात पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री रेणुकाचार्य यांच्या जयंतीनिमित्त 20 ते 22 मार्च दरम्यान वीरशैव, लिंगायत समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, 22 मार्च रोजी जयंती उत्सवाचा कार्यक्रम असल्याने सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे