परळी :तालुक्यातील नागापूर वाण मध्यम धरणा पाठोपाठ नंदनज जवळील बोरणा मध्यम प्रकल्प ही शनिवारी भरला असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. बोरणा धरण 100% भरले आहे. त्याबरोबर कन्हेरवाडी ,खोडवा सावरगाव कातकरवाडी, दैठना घाट हे लघु प्रकल्प भरले आहे गोपाळपूर लघु प्रकल्पात 99 टक्के पाणीसाठा झाला आहे. परळी तालुक्यातील एकूण 11 पैकी सहा प्रकल्पात 100% पाणीसाठा झाला आहे .अशी माहिती माजलगाव पाटबंधारे कार्यालय परळीचे विनोद मिसाळ यांनी दिली. बोरणा धरण शनिवारी भरल्याने नंदनज मांडवा , मिरवट, मरळवाडी ,सारडगाव ,कासारवाडी येथील पाण्याचा प्रश्न मिटला असून सिंचनासाठी उपयुक्त होणार आहे.असे नंदनज शेतकरी हनुमंत गुट्टे यांनी सांगितले.