परळी इ.स. 2024-25 या शैक्षणिक वर्षातील क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व बीड जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित परळी तालुका क्रीडा स्पर्धेस सोमवार 12/08/2024 पासून दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल ( बीड रोड ) तळेगाव या शाळेत सुरूवात होणार आहे.
बुद्धिबळ या खेळा पासून क्रीडा स्पर्धेस सुरूवात होणार आहे. गटशिक्षण अधिकारी कार्यालय परळी येथे गटशिक्षण अधिकारी . कणाके यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांची बैठक झाली. त्या बैठकीतील निर्णयानुसार परळी तालुका क्रीडा समन्वयक श्री. संजय (पापा) देशमुख यांनी स्पर्धा कार्यक्रमाची आखणी केली. त्यानुसार सर्व स्पर्धा पार पडतील.
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल तळेगाव या ठिकाणी आयोजित तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या निम्मिताने होणाऱ्या ऊदघाटन पर कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यथानी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल चे मुख्याध्यापक श्री. डॉ. श्रीकांत पाटील तर उदघाटक म्हणून परळी तालुका गटशिक्षण अधिकारी श्रीराम जी कणाके असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून परळी ता. शा. शिक्षक संघटनेचे अध्यक्ष . श्री. एस. पी. मुंडे , राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे परळी शहर अध्यक्ष. श्री. अजय जोशी , शारीरिक शिक्षक संघटनेचे परळी शहर अध्यक्ष श्री. विलास अरगडे, परळी ता. क्रीडा समन्वयक श्री. संजय (पापा) देशमुख , दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे पालक श्री. महादेव फड, मा. श्री. चंद्रकांत गायकवाड इत्यादी प्रमुख पाहुणे असतील.
स्पर्धेचे पंच म्हणून श्री. विजयकुमार तपके, श्री. सुशील दहिफळे, श्री. सिताराम कराड हे काम पाहतील.
सदरील स्पर्धा व उदघाटन कार्यक्रमासाठी परळी ता. व शहर शिक्षक संघटनेचे सदस्य श्री. विजय मुंडे श्री. यशवंत कांबळे ,श्री. सिताराम गुट्टे , श्री. मदन कराड , श्री. लक्ष्मण राडकर , श्री. जगदीश कावरे श्री. सुनील तारे श्री. श्रीधर जाधव ,श्री. संजय शेप , कु. संघमित्रा हुमने इत्यादी उपस्थित राहणार आहेत. त्रिपुरा सरकार चे सचिव किरण गित्ते व विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ उषाताई किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल ( बीड रोड ) तळेगाव या शाळेत क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.