परळी . कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे परळी शहरातील युवा नेतृत्व व परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दि.११ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक ११ ऑगस्ट रोजी स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह, आंबेवेस, परळी वैजनाथ येथे दि.११ ऑगस्ट २०२४ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० वा.पासुन शिबिर सुरू होणार आहे. दिवसभर रक्तदात्यांना रक्तदान करता येणार आहे. दरवर्षी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. गेल्या ११ वर्षांपासुन रक्तदान शिबिर घेण्यात येते .दरवर्षी नवनविन रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदानाचे कार्य रूजविणे बाबत जागृती करणारा परळीतील हा उपक्रम आहे.या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.