परळी वैजनाथ
शिवचैतन्य जागरण यात्रेचे शुक्रवार, दिनांक ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता परळी शहरात आगमन होणार आहे. यात्रेनिमित्त प.पू.स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांचे स्वागत केले जाणार आहे .येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इटके कॉर्नर चौक पर्यंत भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे
शिवचैतन्य जागरण यात्रेचे शुक्रवार, दिनांक ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता परळी शहरात आगमन होणार आहे. शिवचैतन्य जागरण यात्रेनिमित्त प्रमुख मार्गदर्शक प.पू.स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज (कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या उपाध्यक्ष, श्रीकृष्ण जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, मथुरा)येत आहेत. तरी या कार्यक्रमास परळी शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहकुटूंब उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक, लोकोत्सव समिती , परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.