परळी : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या उपनेत्या प्रा, सुषमाताई अंधारे यांच्या वाढदिवसानिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग येथे रुद्राभिषेक पूजन करून सुषमाताई यांना उदंड व निरोगी सुख समृद्धीचे आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली .यावेळी प्रभू वैद्यनाथ चा जयघोष करण्यात आला. शिवसेनेच्या उप नेत्या सुषमाताई अंधारे यांनी सात तारखेला परळी येथील निवासस्थानी राज्यातील विधानसभा प्रचाराच्या परळी वैजनाथ करण्यात आली. परळी शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते यांच्या कार्याल्या मध्ये शिवसेना व महिला आघाडीच्या वतीने प्रा सुषमाताई अंधारे यांचा वाढदिवस महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख प्रमिला लांडगे ताई यांनी औक्षण करून शाल हार श्रीफळ देऊन साजरा करण्यात आला .यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल, शहर प्रमुख राजेश विभुते , जगन्नाथ साळुंखे , समन्वयक भरत इंगळे, उपतालुकाप्रमुख महेश केंद्रे ,शिवसेना तालुका सचिव प्रकाश साळुंके , युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन लोढा ,राहुल उपाडे ,विशाल गावडे ,विजय जाधव ,हरीश पालीवाल व इतर शिवसैनिक उपस्थित होते, औसा ,घनसांगवी ,खेड ,आळंदी ,कल्याण ,डोंबिवली अंबरनाथ ,वांद्रे पूर्व ,वरळी ,भायखळा ,,बडनेर ,दर्यापूर धामणगाव या मतदारसंघात त्यांच्या सभा आहेत. प्रचारासाठी त्या परळीतून रवाना झाल्या आहेत