परळी : प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्री 26 फेब्रुवारी महाशिवरात्री उत्सव होणार आहे ..महाशिवरात्रीची पूर्व तयारीची बैठक 11 फेब्रुवारी रोजी बीड चे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या निर्देशानुसार श्री वैद्यनाथ मंदिर मधील सभागृहात होणार आहे. या बैठकीस श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव व सर्व विश्वस्त तसेच जिल्हा परिषद अधिकारी,पोलीस अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, वीज वितरण, एस टी महामंडळ, जिल्हा शल्य चिकित्सक, सार्वजनिक बांधकाम, नगर परिषद ,गटविकास अधिकारी यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीत महाशिवरात्रीनिमित्त श्री वैद्यनाथा च्या दर्शनासाठी26 फेब्रुवारी रोजी राज्य व परराज्यातून येणाऱ्या लाखो शिवभक्तांची सोय व्हावी व दर्शन घेणे सुलभ व्हावे या अनुषंगाने तयारी करण्याचे नियोजन आखले जाणार आहे. महाशिवरात्रीच्या अनुषंगाने श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या भाविकांचे दर्शन घेणे सोयीस्कर व्हावे यासाठी महिला, पुरुष व पासधारकांच्या तीन लावण्यात येणार आहे. श्री वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर सध्या नागमोडी आकारात लोखंडी बरिकेट्स उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. अशी माहिती श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट. सेक्रेटरी प्राध्यापक बाबासाहेब देशमुख यांनी दिली. महाशिवरात्रीच्या पूर्वतयारीची बैठक 11 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता श्री वैद्यनाथ मंदिराच्या सभागृहात सर्व शासकीय विभाग प्रमुखांची बैठक बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षस्थानी होणार आहे. असे बीड चे अप्पर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी कळविले आहे