परळी: गोरक्षण सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी परळी नगरपालिकेसमोर सुरू केलेल्या उपोषणाला चार मार्च रोजी सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे आणि पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण यांच्यासोबत उपोषण स्थळी चर्चा केली. अधिकाऱ्यांनी या मागण्यांवर लवकर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
गोरक्षण सेवा संघाचे कार्यकर्ते बळीराम परांडे, विजय बडे, माऊली मंडलिक, प्रेम शंकूरवार, दीपक जोशी हे तीन मार्चपासून उपोषण करीत आहेत. त्यांची प्रमुख मागणी म्हणजे परळी शहर आणि सिरसाळा परिसरातील बेकायदा कत्तलखाने बंद करणे, नगरपालिकेच्या ताब्यातील कोंडवाडा गोरक्षण सेवकांच्या ताब्यात देणे, , एसओपी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे आणि पोलीस यंत्रणेकडून गोसंरक्षकांना सहकार्य मिळावे.
या आंदोलनास अँड. मनोज संकाये मित्र मंडळाचा जाहीर पाठिंबा असून, मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी अँड. संकाये यांनी प्रशासनाकडे केली आहे. यावेळी अनिल चौधरी, राम जोशी, मुंजाभाऊ साठे, शिरिष सलगरे, संदीप चौधरी, संतोष कांबळे, गिरीश सुपेकर आणि मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.