परळी - देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू श्री वैद्यनाथांच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीपासून म्हणजे 26 फेब्रुवारीपासून 7 मार्च पर्यंत दररोज बाहेरगावच्या भाविकांचा ओघ चालूच आहे. गेल्या आठ दिवसापासून भाविकांच्या मोठ्या संख्येने वैद्यनाथ मंदिर गजबजले आहे. येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात कर्नाटकातील मैसूर येथील भाविक
श्रीमती नागलक्ष्मी लक्ष्मीशा, यांनी दर्शन घेऊन ५ मार्च २०२५ रोजी गुरु विद्वान. आर. के. पद्मनाभ, मैसूर यांच्या आशीर्वादाने वीणावादन सादर केले.त्यांच्या भक्तिमय वीणावादनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.