बीड रेल्वे स्टेशन व रेल्वे मार्गाची करणार पाहणी. परळी,घाटनांदुर ग्रामस्थांशी साधणार संवाद
परळी : महाराष्ट्र, मध्य प्रदेश व कर्नाटक राज्याचे प्रादेशिक रेल्वे सल्लागार म्हणून पुणे येथील डॉक्टर आदित्य पतकराव यांची भारत सरकार तर्फे नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे .ते 26 मार्च रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. घाटनांदुरचे सरपंच महेश आप्पा गारटे व इतर ग्रामस्थ सोबत 26 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहात चर्चा करणार आहेत . अंबाजोगाई येथून बीड कडे कारने प्रयाण करणार आहेत, दुपारी दीड वाजता बीड येथील रेल्वे स्टेशन व रेल्वे लाईनची पाहणी करणार आहेत.. दुपारी तीन वाजता परळी येथे आगमन होणार आहे. ते रात्री 7.60 वाजता परळीहून नांदेड ,पनवेल ने पुण्याला रवाना होतील. . परळी रेल्वे स्थानक मार्गे धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांना घाटनांदुर रेल्वे स्थानकावर थांबा नसल्याने रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे. कोविड नंतर नांदेड बंगळरू व औरंगाबाद गुंटूर या रेल्वे गाड्यांना घाटनांदुर रेल्वे स्थानकात थांबा मिळावा या मागणीचे घाटनांदुर ग्रामस्थांतर्फे प्रादेशिक रेल्वे सल्लागार डॉक्टर आदित्य पतकराव यांना निवेदन दिले जाणार आहे तसेच त्यांच्या सोबत चर्चा केली जाणार आहे अशी माहिती सरपंच महेश गारठे यांनी दिली