परळी :महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा व वीरशैव विकास प्रतिष्ठान व वीरशैव लिंगायत समाज परळी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील
संत गुरुलिंग स्वामी मंदिर बेलवाडी येथे रविवारी दहावी बारावी, परीक्षेतील वीरशेव समाजातील ५१ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष दत्ताआप्पा इटके गुरुजी होते प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष सोमनाथ आप्पा हालगे, वैद्यनाथ मंदिराचे विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे ,संत गुरुलिंग स्वामी मंदिराचे सेक्रेटरी ॲड गिरीश चौधरी, वक्रेश्वर मंदिराचे विश्वस्त नारायण आप्पा खके ,दयानंद स्वामी ,सुभाष आप्पा भिंगोरे ,शिवकुमार व्यवहारे ,समर्थ शिक्षक प्रसारक मंडळाचे सचिव प्रभाकर इटके प्रकाश खोत ,यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी बोलताना दत्ताप्पा इटके गुरुजी यांनी दहावी बारावी मध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले व डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक व्यापारी बनण्यासाठी व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी झाल्याच्या नंतर आई-वडिलांना विसरू नये असे सांगितले यावेळी माजी नगराध्यक्ष सोमनाथ आप्पा हालगे यावेळेस बोलताना म्हणाले अभ्यासात सातत ठेवून पुढचं भविष्य उज्वल करा असे म्हणाले यावेळी श्रीकांत निर्मळे
व सचिन स्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मोमेंटो प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक नावंदे गुरुजी यांनी केले
यावेळी वीरशेव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम बुद्रे, सचिव प्रा. सुधीर फुलारी , महाराष्ट्र वीरशैव सभेचे तालुकाध्यक्ष महादेव इटके, महाराष्ट्र वीरशेव सभा परळी शहराध्यक्ष नितीन समशेट्टी, महाराष्ट्र वीरशेव सभेचे कार्याध्यक्ष रमेश चौडे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवकुमार केदारी ,सहसचिव विकास हालगे, वैद्यनाथ बँकेचे संचालक महेश्वर निर्मळे, चंद्रकांत उदगीरकर सोमनाथ गोपनपाळे ,राजेश साखरे दत्तात्रेय गोपनपाळे , संतोष जुजगर ,शिवकुमार चौंडे ,तलाठी रमाकांत गुजर ,संजय कोरे नागेश फरकडी ,नागेश हाते, राहुल निर्मळे, नरेश पिंपळे बंडू चौंडे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय स्वामी यांनी केले तर आभार प्रदर्शन सोमनाथ गोपनपाळे यांनी केली या यावेळी समाजातील पुरुष महिला बहुसंख्य संख्येने उपस्थित होते