परळी : राजकारणात वजनदार भूमिका बजावत असतानाही विनम्रता आणि माणुसकीचा चेहरा कायम ठेवणारे राजेभाऊ फड यांनी यंदा आपला वाढदिवस तीन जून रोजी अगदी साधेपणाने, पण भावनिक नात्यांना जपणाऱ्या शैलीत साजरा केला.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी परळीत येऊन स्वतः राजेभाऊंना शुभेच्छा दिल्या. या विशेष भेटीत केवळ केक कापण्यात आला नाही, तर रामरक्षा गोशाळेत चारा वाटप करून एक सामाजिक भानही दाखवले गेले. तब्बल चार ते पाच तास राजेभाऊंसोबत राहून जानकर यांनी त्यांच्या सोबत आनंदाचे क्षण साजरे केले. त्यांनी ठाम शब्दांत सांगितले, "राजेभाऊ फड यांचे भविष्यात मोठे राजकीय योगदान असेल. त्यासाठी माझ्याकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल."
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष )चे नेते राजेभाऊंच्या वाढदिवसाला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैद्यकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील शेकडो मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रत्यक्ष भेटीद्वारे तसेच दूरध्वनीवरून आलेल्या शुभेच्छा त्यांनी संयमाने आणि कृतज्ञतेने स्वीकारल्या. फड म्हणाले, “आपल्या माणसांनी दिलेल्या प्रेमाने आणि स्नेहाने मी भारावून गेलो आहे. या ऋणातून उतराई होणे अशक्य आहे.”
वाढदिवस साजरा करताना फड यांनी साधेपणाची भूमिका का घेतली, यामागेही एक हृदयस्पर्शी कारण होते. माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार स्व. आर. टी. (जिजा) देशमुख यांचे अलीकडेच दुःखद निधन झाले. जिजा यांच्याशी फड यांचे स्नेहाचे नाते होते. त्यांच्या आठवणींनी भावनाविवश झालेले फड यांनी कोणताही जल्लोष न करता फक्त शुभेच्छा स्वीकारण्यावर भर दिला.
तीन जून रोजी महाराष्ट्राचे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा पुण्यस्मरण दिन असल्याने फड यांनी गोपीनाथगड येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण अभिवादन केले.
हा वाढदिवस केवळ एक सोहळा नव्हता, तर नात्यांची उब, सामाजिक बांधिलकी आणि विनम्रतेचा एक सुंदर संदेश होता – जो 'राजेभाऊ' या नावाला खरंच शोभून दिसतो!