परळी (प्रतिनिधी) : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे सोमवारी रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे )उपनेते व परभणीचे खासदार संजय जाधव यांनी अत्यंत श्रद्धेने दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी परळीचे माजी उपनगराध्यक्ष राजा भैय्या पांडे यांच्या निवासस्थानी जाऊन अभिषेक व साक्षी या नवविवाहित दाम्पत्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या वेळी प्रा. पंढरीनाथ धोंडगे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) चे उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल, तसेच सिराजभाई (कॉन्ट्रॅक्टर) उपस्थित होते.
खासदार संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. नारायण सातपुते, भोजराज पालीवाल, राजा पांडे व सिराज कॉन्ट्रॅक्टर , संजय खाकरे, गणेश कासार, मुकुंद नानावटे,रमाकांत रेवडकर, मनोज रामदासी यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
या भेटीद्वारे राजकीय व सामाजिक सौहार्दाची जाणीव पुन्हा एकदा दिसून आली.
.