प्रशासनाची ढिलाई: नागापूर धरणातील गाळ घेऊन जाणारे वहाने सुसाट, टोकवाडी -नागापूर-बोधेगाव रस्त्याच्या दूतर्फेस गाळ पडत असल्याने अकरा गावचे ग्रामस्थ बेजार -काँग्रेस चे प्रा विजय मुंडे यांची तक्रार परळी :तालुक्यातील नागापूर धरणात अनाधिकृत पोकलेन मशीन लावून काही जण गाळ काढून त्याचा वीटभट्टीसाठी वापर करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, तसेच क्षमतेपेक्षा जास्त गाळ ट्रॅक्टर व हायवा मधून सर्रासपणे घेऊन जात असल्याने वाहनातील जास्तीचा गाळ रस्त्यावरच पडल्या जात आहे. त्यामुळे टोकवाडी-डाबी-नागापूर - बाधेगाव या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, याकडे महसूल ,पाटबंधारे, पोलीस या विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसचे परळी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष प्रा. विजय मुंडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या मुरमाड जमिनी सुपीक व्हाव्यात म्हणून नागापूर धरणातील गाळ शेतकऱ्यांना मोफत देणे सुरू केले आहे, परंतु काही जण गाळ माती वीटभट्टीसाठी घेऊन जात असून त्याचा धंदा सुरू केला आहे व विशेष म्हणजे ही गाळ घेऊन जाणारी वहाने सुसाट वेगाने सुटत आहेत, टोकवाडी -नागापूर - बोधेगाव या रस्त्यावर गाळ सांडत असल्याने रस्ता खराब होऊन प्रदूषण वाढले आहे व दुचाकी वहाने चालविणे अशक्य झाले आहे .त्याचा या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून नागापूर, दौनापूर ,बहादूरवाडी, डाबी ,मांडेखेल, अस्वलअांबा, बोधेगाव ,कावळ्याची वाडी ,वाघाळा, सोनहिवरा, माळहिवरा येथील ग्रामस्थाना जीव मुठीत धरून येणे जाणे करावे लागत आहे, सद्या धरणातून दररोज 200 ट्रॅक्टर ,हायवा आदी वाहनातून भरून गाळ नेल्या जात असल्याने नागपूर ते टोकवाडी, नागापुर ते बोधेगाव या रस्त्यावर वाहतूक व्यवस्था कोलमोडली आहे परळी -पिंपळा धायगुडा रस्त्याचे काम अर्धवट असल्याने अंबाजोगाई ला जाण्यासाठी टोकवाडी -नागापूर साकुड -अंबाजोगाई याच रस्त्याचा वापर शेकडो प्रवासी करत आहेत. त्यांनाही बेशिस्तीत गाळ नेणाऱ्या वाहनांचा त्रास होत आहे या रस्त्यावर संबंधितानी लक्ष देण्याची मागणी प्रा विजय मुंडे यांनी केली आहे .महसूल ,पाटबंधारे व पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बेशिस्त पणे गाड्याची वाहतूक चालू आहे त्यावर आवर घालण्याची मागणीही प्राध्यापक मुंडे यांनी केली आहे गाळ अनाधिकृतपणे उपसा करून वीटभट्टीसाठी वापरल्या जात आहे यास या प्रशासनाचे अभय का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला , या संदर्भात वहाणाची क्षमता जेवढी तेवढाच गाळ भरून घेऊन जावा, रस्त्याने सांडणार नाही याची काळजी घ्यावी ,तक्रारीची दखल घेऊन तलाठयास पाठवून देऊन योग्य कार्यवाही करू असे परळी चे तहसिलदार विपीन पाटील यांनी सांगितले