*वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाला ३५ कोटी तर शासकीय विश्रामगृहासाठी १० कोटीची झाली तरतूद*
मुंबई दि. १८ ---- परळी मतदारसंघाच्या विकासाचा सातत्याने ध्यास घेतलेल्या
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी शहराच्या विकासासाठी आजच्या अर्थसंकल्पातून भरीव निधी मंजूर करून घेतला आहे. वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत ३५ कोटी रूपये तर शासकीय विश्रामगृह बांधण्याकरिता १० कोटी रुपये निधीची तरतूद अर्थसंकल्पात झाली आहे.
ना पंकजाताई मुंडे हया राज्याच्या मंत्री असल्या तरी परळी मतदारसंघाच्या आमदार असल्याने त्यांचे या भागाच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे. गेल्या साडे वर्षात सत्तेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरासाठी देखील मोठा निधी आणला. राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण रस्ते, जलसंधारणाची कामे याबरोबरच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या तीर्थक्षेत्र विकासाचा १३३ कोटी ५८ लक्ष रूपयांचा विकास आराखडा त्यांनी मंजूर करून आणला, या आराखड्यातील कामांसाठी ३५ कोटी रुपयांचा निधी आजच्या अर्थसंकल्पात पुरवणी मागणीद्वारे त्यांनी मंजूर करून घेतला आहे. या निधीतून वैद्यनाथ मंदिर व परिसरातील अनेक कामे लवकरच हाती घेतली जाणार आहेत.-शिवाजी चौकात असणारे बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह सध्या मोडकळीस आले आहे, शिवाय अंबाजोगाई रस्त्यावर असणा-या व्हीआयपी विश्रामगृहाची अवस्था देखील बिकट झाली आहे, अशा परिस्थितीत तीर्थक्षेत्र असणा-या शहरात बाहेरून येणा-या पाहूण्यांसाठी निवासाची सोय व्हावी यासाठी शिवाजी चौकात भव्य विश्रामगृह बांधण्याकरिता ना. पंकजाताई मुंडे यांनी १० कोटी रुपयांचा निधी बजेटमध्ये उपलब्ध करून घेतला आहे, आजच्या अर्थसंकल्पात शहरातील दोन्ही विकास कामांसाठी भरीव निधी मिळाल्याने नागरिकांनी ना. पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.
••••