वैद्यनाथ कॉलेजचा विद्यार्थी ओम बालवदकर आंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत सर्वप्रथम परळी,.. जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमधील विद्यार्थी ओम हरीश बालवदकर याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आयोजित जलतरण स्पर्धेत सहभाग घेऊन सदरील स्पर्धेत सर्वप्रथम यश संपादन केले आहे. या स्पर्धेमध्ये जवळपास विद्यापीठ क्षेत्रातील 39 स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता. ओम बालवडकर यांने 50 मी. व 200 मी. (फ्री स्टाईल ) पोहणे या स्पर्धेत घवघवीत प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ डी. व्ही. मेश्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा महाविद्यालयातील क्रिडासंचालक डॉ. पी. एल. कराड व प्रा डॉ विजय बेंडसुरे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी चि. ओम बालवदकर यांचे अभिनंदन केले आहे.