परळी ,शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूरच्या वाण धरणातिल पाणी साठा संपत आल्याने चारी व विहिरीला ही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे . शहराला आठदिवसाला एकदा सुटणाऱ्या नळाचे पाणी आता तेही वेळेवर शक्य होणार नाही,आठ दिवसाला एकदा नगरपरिषदेचे जलकुंभ भरण्यास ही पाच तास उशीर होत असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे .नागापूरच्या धरणातील चारी व विहिरीत कमी दाबाने पाणी होत आहे त्यामुळे शहरातील जलकुंभ मध्ये पाणी येण्यास विलंब होत आहे .सध्या परळीत आठ दिवसानंतर नळाला पाणी पुरवठा होत आहेशहराला आठदिवसाला एकदा सुटणाऱ्या नळाचे पाणी आता तेही वेळेवर शक्य होणार नाही,पर्याय म्हणून नगरपरिषदेच्यावतीने प्रभागात 30 टॅंकरने पाणीपुरवठा चालू आहे . शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनीही मोफत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे प्रत्येक प्रभागात टँकर येताच पाणी भरण्यासाठी नागरिकांच्या उड्या पडत आहे. पाण्यासाठी काही ठिकाणी नागरिक हमरीतुमरी येत आहे .कधी नव्हे एवढी गंभीर परिस्थिती पाण्याच्या बाबतीत परळीत यंदा झाली आहे. आठ दिवसाला सुटणारे नळाचे पाणी आता किती दिवसाला सुटणार असा प्रश्न निर्माण झाला आहे