प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – जागतिक योग दिनानिमित्त, परळी शहरातील जिजामाता गार्डन येथे २१ जून २०२५ रोजी भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम नगर परिषद परळी वैजनाथ, पतंजली योग समिती आणि जिजामाता उद्यान ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष योग साधना करून नागरिकांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमात योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा तसेच आरोग्यदायी जीवनशैलीसंदर्भातील प्रात्यक्षिक सत्र घेण्यात आले. स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो नागरिक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या प्रसंगी उपस्थितांचे स्वागत करताना "योग हा केवळ व्यायाम नसून मन, शरीर व आत्मा यांचा समतोल राखणारा जीवनशैलीचा मूलमंत्र आहे" असा संदेश देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान सहभागी नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान, शांती आणि उत्साहाची झळक स्पष्ट दिसून येत होती.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात नगर परिषदेतील अभियंता ज्ञानेश्वर ढवळे, विजय गायकवाड, पंकज दहातोंडे, विश्वजीत दुबे, विक्रम स्वामी, शेख वसीम, प्रदीप नवाडे, संतोष स्वामी, शंकर साळवे, सुनील आदोडे, मुक्ताराम घुगे, सिद्धेश्वर घोंगडे, धनराज भाडेकर, मुंजाजी सूळ, शुभम मुळी, दिनेश भोयटे, परशुराम शिंदे, इस्माईल तांबोळी, तसेच पतंजली योग समिती च्यासरला उपाध्य, शालिनी बोधे, गोल्डमेडलिस्ट सोमेद्र शास्त्री, तहसील कार्यालयातील कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले.