परळीत नगर परिषद कर्मचार्यांची सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी निदर्शनेे
परळी
नगर परिषद कर्मचार्यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी दि.१४ जून रोजी येथील नगर परिषद कार्यालयापुढे घोषणा देत निदर्शने केली. १ जानेवारी २०१९ रोजी सातवा वेतन आयोग व इतर महत्वाच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र नगर परिषद कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केले होते. १ जानेवारी २०१९ रोजी प्रधान सचिव व नगर विकास मंत्र्याबरोबर संघर्ष समितीच्या नेत्यांची यशस्वी बोलणी झाली व मागण्या मान्य केल्यामुळे त्यावेळी संप मागे घेण्यात आला. परंतू अद्यापही महाराष्ट्र सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे महाराष्ट्र नगर परिषद कर्मचार्यांनी संताप व्यक्त करण्यासाठी व सरकारचे लक्ष वेधन्यासाठी दि.१४ जून रोजी नगर परिषद कार्यालयापुढे घोषणा देत निदर्शने केली. यावेळी शिष्टमंडळासमवेत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निदर्शन आंदोलनामध्ये नगर परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष प्रा.बी.जी.खाडे, उपाध्यक्ष शंकर साळवे, विलास केदारे, दिलीप रोडे, राजाभाऊ जगतकर, किरण उपाडे, अबुजर, सुर्यकांत डहाळे, दशरथ जगतकर, पी.के.कुलकर्णी, एस.पी.घोंगडे, विलास जगतकर, प्रविण मोगरकर, एस.व्ही.घाटे, नामदेव साळवे, मल्लिकार्जुन खाकरे, सुनिल आदोडे, पारेकर, अंजली बांगर, शिंदे रोडे , वाघमारे यांच्यासह परळी नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.