मूर्ती गावातून पहिल्या राजपत्रित अधिकारी होण्याचा फटकाविला बहुमान
परळी (प्रतिनिधी):- अंबाजोगाई तालुक्यातील
मूर्ती येथील मा. सरपंच तथा सेवा सहकारी सोसायटी मूर्ती -वाकडी लाडझरी चे विद्यमान चेअरमन विश्वांभर फड यांची कन्या कु. रोहिणी फड ही एमपीएससी परीक्षा अंतर्गत राजपत्रित अधिकारी (बी डी ओ )पदासाठी पात्र ठरली असून मुलीमध्ये महाराष्ट्रातून 59 बँक प्राप्त केली आहे तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कु. रोहिणी विश्वांभर फड प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूर्ती येथे झाले तर माध्यमिक शिक्षण सोमेश्वर विद्यालय घाटनांदुर येथे झाले आहे त्यानंतर अकरावी बारावीचे शिक्षण योगेश्वरी कन्या शाळा अंबाजोगाई येथे झाले होते. उच्च शिक्षण नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंग गव्हर्मेंट इंजीनियरिंग कॉलेजमध्ये पार पडले. त्यानंतर एमपीएससी च्या अभ्यासासाठी पुणे येथे शिक्षण घेऊन ती राजपत्रित अधिकारी बी डी ओ पदासाठी पात्र ठरली. मूर्ती गावातील महिला अधिकारी होण्याचा बहुमान कु.रोहिणी विश्वांभर
फड हिने पटकाविला आहे. रोहिणी हिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे अभिनंदन तिचे आई वडील रेणुका विश्वांभर फड व शिक्षक तसेच मूर्ती ग्रामस्थ व मित्र परिवारांच्या वतीने करण्यात येत आहे.