परळी, स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटी परळीच्या वतिने दि.12 जानेवारी रोजी परळी शहरात दुसरी मॅरेथॉन स्पर्धा झाली,आज सकाळी 7,30 वा. या मॅरेथॉन स्पर्धेला प्रसिद्ध पहेलवान राहुल आवारे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला, येथील पोलीस ठाणे, राणी लक्ष्मीबाई टावर, मोंढा रोड, स्टेशन रोड, एकमिनार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मौलाना अबुल कलाम आझाद चौक, वडार कॉलनी मार्गे ही मॅरेथॉन पोलीस ठाण्यापर्यंत धावली, विजेत्या स्पर्धकांचे पुण्याचे महानगर आयुक्त किरण गित्ते, दिनकरराव मुंडे गुरूजी, उषा किरण गित्ते ,मंदाकिनी केंद्रे, किशोर गित्ते यांनी स्वगात केले , या मध्ये महाविद्यालयिन विद्यार्थी, महिला-पुरुष सहभागी झाले होते,