यश गौरव ग्रंथाचे प्रकाशन विलासराव ताटे यांचे कार्य प्रेरणादायी-विकासराव डूबे
परळी
येथील सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित व्यापारी विलासराव रामेश्वरराव ताटे यांनी अत्यंत गरीबीतून, कष्टातून जीवनात यश मिळवले व अनेकांच्या यशा साठी साथ दिली . त्यांचे जीवन आणि कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे असे मत वैद्यनाथ अर्बन बँकेचे संचालक व माजी चेअरमन विकासराव डूबे यांनी येथे आयोजित गौरव समारंभात व्यक्त केले
येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या दर्शन मंडप सभागृहात श्री ताटे यांचा एकसष्टीनिमित्त व त्यांच्या सामाजिक, धार्मिक कार्याबद्दल गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास जेष्ठ उद्योजक विकासराव डुबे, मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.एस.घाडगे, जेष्ठ नेते दत्ताप्पा इटके, नगराध्यक्षा सरोजनी हालगे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जुगलकिशोर लोहिया, नगरसेवक चंदुलाल बियाणी, जिल्हा परिषदेचे सदस्य अजय मुंडे, एम.टी.देशमुख, बाळासाहेब देशमुख, वैजनाथ जगतकर, डॉ.शालीनी कराड, गोपाळ आंधळे, अनिल आष्टेकर, अभयकुमार ठक्कर, मिलिंद घाडगे, प्रा.प्रदीप देशमुख, प्रा.बाबा देशमुख, महादेव इटके, भोजराज पालिवाल, भाऊराव भोयटे, शंकर आडेपवार, शंकरराव पेन्टेवार, वसंत मुंडे, श्रीकांत पाथरकर, अतुल दुबे, भरत महाराज सोडगीर, बाळासाहेब साळी, रविंद्र साळी, सुरेश सरोदे, बालासाहेब पोरे, नितीन भंडारे, सुरेश लंगोटे, विलास सोनारे, राजेंद्र तातेड, रामेश्वर महाराज कोकाटे, कमलबाई दहातोंडे, संजय खाकरे, एल.आय. वाकडे, बालकिशन सोनी, धिरज जंगले, अनंत कुलकर्णी, प्रा.प्रवीण फुटके, प्रा.जगतकर, सुशिल हरंगुळे यांच्यासह नागरिक, कार्यकर्ते, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला भरत महाराज सोडगीर यांचे प्रवचन झाले, त्यानंतर श्री ताटे यांची ग्रंथतुला करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या यश गौरवग्रंथाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री ताटे यांच त्यांच्या पत्नी स्वाती ताटे यांचा 51 व्या वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ, पुष्पहार देवून व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. विविध संस्था, संघटना व नागरिकांच्या वतीने श्री ताटे यांचा यावेळी सत्कार केला गेला. प्रास्ताविक राहुल ताटे यांनी केले. यावेळी दत्ताप्पा इटके, श्री साळी, श्री घाडगे, श्री डुबे, श्री धर्माधिकारी, श्री खाकरे, श्री वाकडे, स्वाती ताटे, श्री ताटे आदींनी विचार मांडले. आभार प्रदर्शन राजश्री ताटे यांनी केले. यावेळी गायक शेरखॉ पठाण यांनी संगीत रचना सादर केल्या. सुत्रसंचालन श्री संजय सुरवसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल ताटे, राजश्री ताटे, रोहिणी सरोदे, राधा साळी, रोहित ताटे, रोहण ताटे, प्रेमला ताटे, अरुणाबाई पोरे, रंजना लिमकर, माधव पवार, अजय टेकाळे, रामेश्वर फडकरी, अतुल ताटे, गजानन हालगे, सुजित सालमोटे आदींनी परिश्रम घेतले