5 मे रोजी माजी खा.कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्यावर लिखीत "मार्क्सवादी कर्मयोगी' पुस्तक प्रकाशन समारंभ
परळी,थोर स्वातंत्र्य सेनानी ,माजी खा.कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्यावर लिखीत "मार्क्सवादी कर्मयोगी' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवार दि.5 मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सचिव कॉ.नरसय्या आडम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
जनशक्ती प्रकाशन मुंबई आणि माकप बीड जिल्हा कमिटीच्या वतिने जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ.विठ्ठल मोरे लिखीत कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे "मार्क्सवादी कर्मयोगी' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ कार्ल मार्क्स जन्मद्विशताबद्धी सांगता दिन रविवार दि.5 मे रोजी परळी येथील जाजु वाडी परिसरातील विठ्ठल मंदिर सभागृहात सकाळी 11 वा. करण्यात येणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तथा जेष्ठ कामगार नेते कॉ.नरसय्या आडम यांच्या अध्यक्षतेखाली तर अ.भा.किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ.डॉ.अशोक ढवळे, जेष्ठ विचारवंत तथा लेखक विठ्ठल मोरे, कॉ.किसन गुजर, कॉ.विजय गाभणे, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष कॉ.डॉ.अजित नवले यांच्या उपस्थितीत प्रकाशन समारंभ होणार आहे. कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांनी त्यांच्या हयातीत शेतकरी, शेतमजुर व कामगारांच्या प्रश्नांवर केलेले लढे आजपर्यंतही लोकांच्या आठवणीत आहेत. तसेच दुर्गम डोंगरी भागात विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय केलेली आहे. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास बीड जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.पी.एस.घाडगे, जिल्हा सचिव कॉ.उत्तम माने, डीवायएफआयचे राज्य उपाध्यक्ष कॉ.अजय बुरांडे यांनी केले आहे