शंकरआप्पा मोगरकर यांच्याअमृत महोत्सवीवाढदिवस सोहळ्याचे दि 22 रोजी आयोजन परळी ,येथील सरस्वती विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक, नगरपरिषदेचे शिक्षण समितीचे माजी सभापती ,ज्येष्ठ पत्रकार शंकर आप्पा मोगरकर यांच्या अमृत महोत्सवी ( 75 व्या ) वाढदिवसानिमित्त शनिवारी सकाळी 11 वाजता येथील नंदागौळ रोडवरील त्यांच्या शेतात मित्र परिवार, नातेवाईक, पत्रकार यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .या निमित्त त्यांचा गौरव होणार आहे शंकरअप्पा मोगरकर यांनी परळी शहरात शैक्षणिक, पत्रकारिता,सामाजिक राजकीय, धार्मिक, कृषी आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यावर त्यांचा आत्तापर्यंत भर राहिला आहे नगरपरिषदेच्या माध्यमातून अनेकांना नोकऱ्या उपलब्ध करून दिले आहेत अनेकांना योग्य मार्गदर्शन करून व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिली , व पत्रकार घडविले ,राजकीय क्षेत्रातही त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे नगरपरिषदेत निवडून गेल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी सभाग्रहात वेळोवेळी आवाज उठविला व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले .गरजू लोकांना कामाची संधी प्राप्त करुन दिली ,धार्मिक क्षेत्रात ते आघाडीवर असत. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान राहिले आहे. राज्य व केंद्रातील दिगग्ज नेत्यांशी त्यांचे संबध होते, सरस्वती विद्यालयात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले , हिंदी हा त्यांचा विषय होता, विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यानी ख्याती मिळविली आहे, सेवानिवृत्ती नंतर ही त्यांनी समाजकार्य केले, अनेक कुटुंबाशी चांगले संबंध त्यांनी जोडले , शुक्रवारी श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख, विश्वस्त प्रा बाबासाहेब देशमुख, शरद मोहरीर यांनी श्री मोगरकर सर यांचे वैदनाथ मंदीरात स्वागत करून शुभेच्छा दिल्या, या वेळी महादेव स्वामी, वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रकाश जोशी, लोकमत चे परळी तालुका प्रतिनिधी संजय खाकरे, न.प चे शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, परळी प्रहार चे संपादक राजेश साबणे, उपस्थित होते